अमृतनगर अंगणवाडीचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 20:03 IST2021-08-10T20:01:38+5:302021-08-10T20:03:08+5:30
लासलगाव : जिल्हा परिषद २२३६ पोषण योजना आहार अंतर्गत ८.५० लाख खर्चून उभारण्यत आलेल्या लासलगाव येथील अमृतनगर अंगणवाडीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सुवर्णा जगताप, शैलजा भावसार, कविता चव्हाण, पिंगटे, काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले. सेविका खांगळ, मदतनीस ज्योती पगार उपस्थित होत्या.
लासलगाव : जिल्हा परिषद २२३६ पोषण योजना आहार अंतर्गत ८.५० लाख खर्चून उभारण्यत आलेल्या लासलगाव येथील अमृतनगर अंगणवाडीचे उद्घाटन करण्यात आले.
अमृतनगर अंगणवाडीला निवारा नसल्याने येथील लहान मुले झाडाखाली बसत होते. त्यांच्या हक्काचे ज्ञानमंदिर पूर्ण झाले असून मंगळवारी (दि.१०) हस्तांतरित करण्यात आले. अध्यक्षस्थानी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप तर ग्रामपंचायत सदस्य संगीता पाटील व माजी सदस्य प्रतिभा पानगव्हाणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती ब्राह्मण महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष स्मिता कुलकर्णी, राष्ट्रीय विश्वगामी तालुका अध्यक्ष ज्योती शिंदे, भाजपा उपाध्यक्ष रूपा केदारे, रंजना शिंदे, पूजा दायमा, ग्रा .प. सदस्य ज्योती निकम, सुनीता शिंदे, भारती महाले, शैलजा भावसार, कविता लोहरकर, सुपरव्हायजर काकडे, पिंगटे उपस्थित होत्या.
यावेळी सुवर्णा जगताप, शैलजा भावसार, कविता चव्हाण, पिंगटे, काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले. सेविका खांगळ, मदतनीस ज्योती पगार उपस्थित होत्या.