बोगस बियाणांमुळे मक्याच्या उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 00:50 IST2018-10-07T00:49:38+5:302018-10-07T00:50:24+5:30
येवला : तालुक्यातील महालखेडा येथील सुमारे ५० शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केलेले मका बियाणे सदोष निघाल्याने मका उत्पादनात मोठी घट येणार आहे. या मका पिकाचा पंचनामा करून शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, मका बियाणे उत्पादक कंपनीवर कारवाई करावी, अन्यथा येवला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.

बोगस बियाणांमुळे मक्याच्या उत्पादनात घट
येवला : तालुक्यातील महालखेडा येथील सुमारे ५० शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केलेले मका बियाणे सदोष निघाल्याने मका उत्पादनात मोठी घट येणार आहे. या मका पिकाचा पंचनामा करून शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात यावी, मका बियाणे उत्पादक कंपनीवर कारवाई करावी, अन्यथा येवला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.
मे महिन्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांच्या जाहिरातींना बळी पडून महालखेडा येथील रोशन कृषी सेवा केंद्राचे संजय पोमनर यांच्या दुकानातून येथील सुमारे ५०-५५ शेतकºयांनी एका कंपनीचे मका बियाणे खरेदी केले. कंपनीने जाहिरात करताना या परिसरात एकरी ४० क्विंटल उत्पादन निघेल, असे सांगितले होते. या भूलथापांना बळी पडून परिसरातील शेतकºयांनी या बियाणाची लागवड केली. महालखेडा परिसरातून दोन कालवे गेलेले असल्याने येथे मुबलक पाणी आहे.
शेतकºयांनी गरजेनुसार पिकाला पाणीही दिले. पिकाची काळजी घेताना जे जे करणे आवश्यक होते ते सर्व सोपस्कार पूर्ण केले.
योग्यवेळी मशागत केली. कृषी खात्याच्या शिफारशीनुसार योग्य प्रकारे पीक संरक्षणाचे उपाय, आंतरमशागत करूनही या मका पिकाचे एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन येईल, अशीच परिस्थिती उभ्या पिकाची आहे. ज्या शेतकºयांनी मका पीक तयार केले त्यांनाही ८ ते ९ क्विंटल प्रती एकर उत्पादन झाले आहे. त्यामुळे परिसरातील या वाणाची लागवड केलेल्या सर्व शेतकºयांचा हा
हंगाम पूर्ण वाया गेला आहे. त्यामुळे कंपनी व रोशन कृषी सेवा केंद्र महालखेडा यांच्या विरोधात येथील शेतकºयांनी संबंधितांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीचे निवारण करावे, अशी मागणी केली आहे.
निवेदनावर जानकीराम खांडेकर, उमा खांडेकर, अंजनाबाई मुरडनर, सोपान पवार, संजय होंडे, बाबासाहेब होंडे, भागचंद खांडेकर, आबा खांडेकर, चांगदेव खांडेकर, संतोष भगत आदींच्या स्वाक्षºया आहेत. परवाना रद्द करानिवेदनात शेतकºयांनी म्हटले आहे की, मका बियाणामुळे परिसरातील शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत प्रत्येक शेतकºयाला एकरी ४० हजार रु पयांचे नुकसान सहन करणे शक्य नाही. त्यामुळे या पिकाचा त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी. कंपनीचा बियाणे उत्पादन परवाना बंद करावा. अन्यथा आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.