नगरपरिषद शाळातील घटती विद्यार्थी संख्या चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:55 IST2021-01-20T21:29:56+5:302021-01-21T00:55:24+5:30

नांदगांव (संजीव धामणे) : शैक्षणिक सुविधांचा जणू दुष्काळ पडल्याने, नांदगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडू लागल्याची प्रचिती या शाळांना येत आहे. दरवर्षी कमी होत जाणाऱ्या विद्यार्थी संख्येने शिक्षण मंडळाला लागलेले ग्रहण अनाकर्षक व कमकुवत होत चाललेल्या वास्तुंमुळे अधिक गडद होत चालल्याने, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांची शहरातली शैक्षणिक कवाडे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आजच्या घडीला सात शाळा मिळून २९ शिक्षक उरले आहेत.

The declining number of students in municipal schools is worrisome | नगरपरिषद शाळातील घटती विद्यार्थी संख्या चिंताजनक

नगरपरिषद शाळातील घटती विद्यार्थी संख्या चिंताजनक

ठळक मुद्देशैक्षणिक सुविधांचा अभाव : सात शाळांसाठी केवळ २९ शिक्षक

नांदगांव (संजीव धामणे) : शैक्षणिक सुविधांचा जणू दुष्काळ पडल्याने, नांदगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडू लागल्याची प्रचिती या शाळांना येत आहे. दरवर्षी कमी होत जाणाऱ्या विद्यार्थी संख्येने शिक्षण मंडळाला लागलेले ग्रहण अनाकर्षक व कमकुवत होत चाललेल्या वास्तुंमुळे अधिक गडद होत चालल्याने, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांची शहरातली शैक्षणिक कवाडे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आजच्या घडीला सात शाळा मिळून २९ शिक्षक उरले आहेत.

गेल्या काही वर्षांत शाळांची संख्या दहावरून सातवर आली असून, विद्यार्थी संख्या १,२०० वरून ६२७ वर आली आहे. सध्या चार मराठी व तीन उर्दू माध्यमांच्या शाळा सुरू आहेत. त्यात अनुक्रमे ३०९ व २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एके काळी शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम दणक्यात साजरे करण्यात येत असत. रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीत सामील होणारे व शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षणप्रेमी शाळांमध्ये हजेरी लावतांना दिसून येत.
आज परिस्थिती बदलली आहे. तुटपुंजे अनुदान, शाळांच्या परिस्थितीकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष यामुळे चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होऊ शकत नसल्याचे दिसून येत आहे. शाळा नंबर १० मध्ये तीन वर्ग खोल्यांमध्ये सात वर्ग बसतात. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात एक, सहा व आठ नंबर अशा तीन शाळा भरतात. सदर इमारतीच्या वरच्या मजल्यावर आठ खोल्या असून, त्यातल्या चार खोल्या पाणी गळतीमुळे व पडझड झाल्याने शेवटच्या घटका मोजत आहेत. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले, त्यात इमारतीचे काम त्वरित करण्याची आवश्यकता आहे.

भाड्याची इमारत
हमालवाड्यावरची शाळा नं. २ असून, ती भाड्याची इमारत आहे. मालक दुरुस्तीसाठी खर्च करायला तयार नसल्याने, शिक्षकांनी स्वखर्चाने कौले बसविली, व्हरांडे दुरुस्त केले. बहुतांश इमारतीमध्ये पाण्याची सोय नाही. वीजपुरवठ्यातल्या तक्रारी, शैक्षणिक साहित्याचा अभाव, यामुळे विद्यादानात अडचणी निर्माण झाल्या असून, या परिस्थितीत तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे. गेल्या दशकात ८१ शिक्षक असलेल्या शिक्षण मंडळाच्या सभापतीपदी निवड होण्यासाठी इच्छुकांची उडीवर उडी पडत असे. शिक्षण मंडळ चालविण्याची जबाबदारी प्रशासनाधिकारी यांचेवर आहे. त्यांचेकडे मनमाड व नांदगाव या दोन ठिकाणांचा पदभार आहे. 

भौतिक सुविधा संगणक, टीव्ही, रंगीत भिंती, उत्तम सजावट रंग व समर्पक भित्तीचित्रे यांची गरज आहे, शिक्षक अनुभवी आहेत. कोरोनातून बाहेर आलो की, अनुदान व लोकसहभागातून उपयुक्त साहित्य खरेदी विचाराधीन आहे.
- निर्मला चंद्रमोरे, प्रशासनाधिकारी

Web Title: The declining number of students in municipal schools is worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.