Decline in summer onion arrivals in Yeola | येवल्यात उन्हाळ कांदा आवकेत घट

येवल्यात उन्हाळ कांदा आवकेत घट

येवला : कृषी उत्पन्न बाजार समिती व अंदरसूल उपबाजार आवारात उन्हाळ कांदा आवकेत घट झाली असून, बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे दिसून आले. सप्ताहात कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांत मागणी चांगली होती. सप्ताहात एकूण कांदा आवक १८ हजार ६३५ क्विंटल झाली असून, लाल कांद्याचे बाजारभाव किमान रु. १५०० ते कमाल रु. ७५०० तर सरासरी रु. ५५०० प्रति क्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक आठ हजार ४१७ क्विंटल झाली असून, कांद्याचे बाजारभाव किमान रु. १५०० ते कमाल रु. ८२५० तर सरासरी रु. ५५०० प्रति क्विंटलपर्यंत होते. सप्ताहात गव्हाच्या आवकेत वाढ झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हास स्थानिक व्यापारीवर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकूण आवक ३०४ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १२०० ते कमाल रु. १७०० तर सरासरी रु. १४५० पर्यंत होते.

सप्ताहात बाजरीची आवक टिकून होती. बाजरीस स्थानिक व्यापारीवर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात बाजरीची एकूण आवक ११४ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १०११ ते कमाल रु. १५०१ तर सरासरी रु. ११८५ पर्यंत होते.
सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत वाढ झाली. सप्ताहात हरभऱ्याची एकूण आवक ९९ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. ३५०० ते कमाल रु. ५२१२ तर सरासरी रु. ४७०० पर्यंत होते.

सप्ताहात मुगाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव तेजीत असल्याचे दिसून आले. मुगास व्यापारीवर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभाव तेजीत होते. सप्ताहात मुगाची एकूण आवक ९७ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. ४००० ते कमाल रु. ८००० तर सरासरी रु. ६००० पर्यंत होते.
सप्ताहात सोयाबीनची आवक टिकून होती. सोयाबीनला स्थानिक व्यापारीवर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात सोयाबीनची एकूण आवक ३१३७ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु.३४६० ते कमाल रु. ४२९६ तर सरासरी रु. ४२०० पर्यंत होते.

सप्ताहात मकाच्या आवकेत वाढ झाली. सप्ताहात मक्याची एकूण आवक ९६२१ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. ८५० ते कमाल रु. १२९९ तर सरासरी रु. ११५० प्रति क्विंटलपर्यंत होते.
उपबाजार पाटोदा येथे मका व भुसार धान्याचे लिलाव सुरू झालेले असून, उपबाजार अंदरसूल येथे रविवारपासून (दि. २५) मका व भुसार धान्याचे लिलाव सुरू होत आहे. शेतकरी बांधवांनी आपला मका व भुसार धान्य शेतीमाल उपबाजारामध्ये विक्रीस आणून बाजार समितीस सहकार्य करण्याचे आवाहन बाजार समिती सभापती उषा शिंदे व संचालक मंडलाने केले आहे.

Web Title: Decline in summer onion arrivals in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.