येवल्यात कांदा आवकेत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST2021-08-15T04:18:19+5:302021-08-15T04:18:19+5:30
येवला : सप्ताहात येवला बाजार समिती मुख्य आवार व अंदरसुल उपबाजार आवारावर उन्हाळ कांदा आवकेत घट झाली, तर बाजारभाव ...

येवल्यात कांदा आवकेत घट
येवला : सप्ताहात येवला बाजार समिती मुख्य आवार व अंदरसुल उपबाजार आवारावर उन्हाळ कांदा आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले.
कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत व परदेशात मागणी सर्वसाधारण होती.
सप्ताहात एकूण कांदा आवक ३१७१७ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ५०० ते कमाल १७८७ रुपये तर सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते.
तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकूण आवक १७५७१ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० ते कमाल १७५५ रुपये, तर सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. (कांद्याचा फोटो वापरावा)