येवल्यात भुसार धान्य आवकेत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 00:16 IST2021-07-05T22:51:59+5:302021-07-06T00:16:13+5:30
येवला : येथील बाजार समिती आवारावर सप्ताहात भुसार धान्य आवकेत घट झाली असून, बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे दिसून आले.

येवल्यात भुसार धान्य आवकेत घट
येवला : येथील बाजार समिती आवारावर सप्ताहात भुसार धान्य आवकेत घट झाली असून, बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे दिसून आले.
सप्ताहात गहू, बाजरी, हरभरा, सोयाबीन, मका आवकेत घट झाली. स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने गहू, बाजरी, हरभरा यांचे बाजारभाव स्थिर राहिले, तर सोयाबीन, मका यांचे बाजारभाव मात्र व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने तेजीत व वाढल्याचे दिसून आले. सप्ताहात गव्हाची एकूण आवक ७० क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान १५७१ ते कमाल १८९९ रुपये, तर सरासरी १६९८ पर्यंत होते. बाजरीची एकूण आवक १५४ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान १४६५ ते कमाल १५२९, तर सरासरी १५१९ रुपये पर्यंत होते. हरभऱ्याची एकूण आवक १४ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ३७७५ ते कमाल रु. १००१, तर सरासरी रु. ४७६० रुपयांपर्यंत होते.
सप्ताहात सोयाबीनची एकूण आवक १५ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ५००० ते कमाल ७२००, तर सरासरी ६८५० रुपयांपर्यंत होते. मक्याची एकूण आवक ३५ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान १७३८ ते कमाल १८५६, तर सरासरी १७७१ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.