शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

गावकारभाऱ्यांचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 1:39 AM

जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्यानंतर सोमवारी (दि.१८) त्यांच्या नशिबाचा फैसला होणार  आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : तालुकापातळीवर होणार मतमोजणी

नाशिक : जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्यानंतर सोमवारी (दि.१८) त्यांच्या नशिबाचा फैसला होणार  आहे.ज्या तालुक्यांमध्ये निवडणूक झाली अशा १३ तालुक्यांमध्ये सकाळी १० वाजेपातून मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून दुपारपर्यंत बहुतेक ग्रामपंचायतींचे निकाल हाती येणार आहेत.नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यापैकी ५५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित ५६५ ग्रामपंचायतीसाठी गेल्या शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये ११ हजार ५६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. ५६५ ग्रामपंचायतींच्या ४२२९ जागांसाठी जिल्ह्यातील ८ लाख ८० हजार ६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ८०.३६ इतकी झाली. जिल्ह्यात सर्वत्र मतदारांचा प्रचंड उत्साह असल्याने निकालाची उत्कंठा वाढली आहे. ग्रामपंचायत निवडणूक झालेल्या तालुक्यांमध्ये १०,९५,९७३ इतक्या मतदारांची नोंद झाली होती. त्यापैकी ८,८०,०६२ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४,०९,४१२ महिला, तर ४,७०,६४९ पुरुष मतदारांचा समावेश आहे.प्रशासनाकडून मतमोजणीची सर्व तयारी करण्यात आली आहे. ज्या तालुक्यांमध्ये मतदान झाले अशा ठिकाणी तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. ग्रामपंचायतींच्या जागांनुसार जिल्ह्यात एकूण १४२ टेबलांवर ही मतमोजणी होणार असून ७४० कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले आहे. सिन्नरमध्ये सर्वाधिक १५७ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी ९० ग्रामपंचायतींसाठी १७०० उमेदवार नशीब अजमावत आहेत. ज्या ठिकाणी अधिक उमेदवार आहेत, अशा ठिकाणी अतिरिक्त टेबल लावण्यात आलेले आहेत. मतमोजणी केंद्रांना मंजुरी दिल्यानंतर अशा सर्व ठिकाणी मतमोजणीसाठी रविवारी संपूर्ण तयारी करण्यात आली. सर्वत्र तहसीलदार या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.२०० मीटरपर्यंतच्या परिसरात पोलीस बंदोबस्तमतमोजणी केंदांवर सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतमोजणी केंद्र परिसरात गर्दी होणार नाही याबाबतची काळजी घेतली जात आहे. केवळ उमेदवार आणि त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधीस परवानगी देण्यात आलेली आहे. मतमोजणी केंद्रांबाहेर गर्दी होणार नाही यासाठी केंद्रापासून २०० मीटरपर्यंतच्या परिसरात पोलीस बंदोबस्तदेखील वाढविण्यात आलेला आहे. 

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक