शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलातील स्थिर आकाराबाबत लवकरच निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:14 IST

सातपुर : सद्य परिस्थितीत राज्यातील व्यापार,उद्योगाला चालना देऊन सकारात्मक वातावरण निर्माण करण्याबरोबरच लॉकडाऊन काळातील वीज बिलातील स्थिर आकार माफ करण्याबाबत लवकरच कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र चेंबर्सच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली.

ठळक मुद्देअजित पवार: चेंबरच्या शिष्टमंडळाला आश्वासन

सातपुर : सद्य परिस्थितीत राज्यातील व्यापार,उद्योगाला चालना देऊन सकारात्मक वातावरण निर्माण करण्याबरोबरच लॉकडाऊन काळातील वीजबिलातील स्थिर आकार माफ करण्याबाबत लवकरच कॅबिनेट बैठकीत निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र चेंबर्सच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरचेंबरच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन व्यापार उद्योगात कोविड-19 परिस्थितीमुळे उदभवलेल्या प्रश्नांबाबत चर्चा केली. यात देशभरात कोरोना लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यापार उद्योग बंद होते.त्यामुळे अर्थचक्रही थांबले होते.त्याचा मोठा परिणाम व्यापार उद्योगांवर झाला आहे.तसेच व्यापार उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी व्हॅट, अभय योजनेस मुदतवाढ देणे,व्यवसाय कर माफी,केंद्र सरकारने एमएसएमइसाठी जाहीर केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी केवळ राष्ट्रीय बँकातून होते.बहुसंख्य उद्योजक य व्यापाऱ्यांचे व्यवहार सहकारी बँकातून होतात व सहकारी बँकेतून कर्जे घेतलेली असतात.अशा स्थितीत या योजनेच्या अंमल बजावणीमध्ये सहकारी बँकांचा समावेश करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारनेही योजना जाहीर करावी. लॉक डाऊनमुळे उद्योजक व्यावसायीक अडचणीत आलेले आहेत अशा स्थितीत लॉकडाऊन काळातील त्यांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यात यावे,लॉकडाऊन काळात व्यापार उद्योग संपूर्ण बंद होता. व्यवहार ठप्प झाले होते.त्यामुळे या काळातील वीजबिले माफ करण्याचा निर्णय होणे गरजेचे आहे. किमान त्याकाळातील स्थिर आकार माफ करावा.अशी मागणी चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केली. याप्रसंगी चेंबरचे विश्वस्त आशिष पेडणेकर,वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी,वेदांशु पाटील,प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

 

टॅग्स :electricityवीजbillबिल