37 मदत चौक्या उभारण्याचा निर्णय

By Admin | Updated: August 6, 2015 00:30 IST2015-08-06T00:29:53+5:302015-08-06T00:30:35+5:30

नियोजन : सिंहस्थ ग्रामोत्सव समितीचा मदतीचा हात

Decision to set up 37 help posts | 37 मदत चौक्या उभारण्याचा निर्णय

37 मदत चौक्या उभारण्याचा निर्णय

37 मदत चौक्या उभारण्याचा निर्णयनियोजन : सिंहस्थ ग्रामोत्सव समितीचा मदतीचा हातनाशिक : येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी शहरातील सिंहस्थ ग्रामोत्सव समितीने शासकीय यंत्रणांना मदतीचा हात देत ३७ चौक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या तात्पुरत्या चौक्या अथवा केंद्रांमध्ये पावणेपाचशे स्वयंसेवक उपलब्ध राहणार असून, गर्दीच्या व्यवस्थापनाबरोबरच हरवलेल्या नागरिकांना पोलिसांपर्यंत नेण्यास मदत केली जाणार आहे.
नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यात वातावरण निर्मिती आणि अन्य सेवा या दृष्टीने ही संस्था कार्यरत राहणार आहे. या संस्थेच्या वतीने पंचवटीसह अन्य भागात ३७ मदत चौक्या अथवा केंद्रे उभी केली जाणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी आणि गावठाणाबाहेर या चौक्या असून, स्वयंसेवकाचे घर अथवा दुकानात हे केंद्र असेल. त्याठिकाणी तसे फलक लावले जातील. तसेच येथे चौकीचा क्रमांक दिला जाईल. त्यामुळे या माध्यमातून कॉल सेंटरवरून समन्वय साधणे सोपे जाणार आहे. चौकीच्या फलकावर चौकी प्रमुख आणि दोन उपप्रमुख यांचे मोबाइल नंबर समितीचा हेल्पलाइन केंद्र अशा प्रकारचे नंबर असतील. प्रत्येक चौकी शंभर ते तीनशे मीटर अंतर दरम्यान असेल. त्या रस्त्यावर सेवा देण्याचे काम स्वयंसेवक करतील. हरवलेली मुले, वृद्ध, महिला यांना आसरा देणे आणि ते शासकीय यंत्रणेकडे हस्तांतरित करणे, भाविकांना गरज वाटत असेल तर उपचार करणे, अशा प्रकारची कामे केली जाणार आहेत. या स्वयंसेवकांना समितीचे ओळखपत्र असेलच; परंतु त्याचबरोबर पोलिसांचे ओळखपत्र असावे यासाठी अगोदरच स्वयंसेवकपदासाठी अर्ज भरून देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Decision to set up 37 help posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.