मसापची कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:01+5:302021-02-05T05:40:01+5:30
सभेच्या अध्यक्षस्थानी शाखेचे उपाध्यक्ष दत्ता गायकवाड होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, प्रसाद पवार, रवींद्र मालुंजकर, सुदाम सातभाई, ...

मसापची कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय
सभेच्या अध्यक्षस्थानी शाखेचे उपाध्यक्ष दत्ता गायकवाड होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, प्रसाद पवार, रवींद्र मालुंजकर, सुदाम सातभाई, नितीन ठाकरे होते. सभेत विद्यमान कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. निवृत्ती अरिंगळे यांनी कार्यकारिणीत महिलांचा सहभाग वाढविण्याची सूचना केली. त्याला सर्वांनी सहमती दिली. तसेच कार्यकारिणीत महिला सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. यावेळी सुरेखा गणोरे, धारा भांड, कामिनी तनपुरे, रेखा पाटील, अलका अमृतकर, दशरथ लोखंडे, प्रशांत केंदाळे, शिवाजी म्हस्के यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. सभेत विष्णुपंत गायखे, माजी न्यायाधीश व्ही. एस. पाटील, छाया पाटील, कृष्णा भगत, संजय भालेराव, रामचंद्र शिंदे, रमेश औटे, रमेश जाधव, दादा आहिरे, प्रशांत कापसे, सुमन आहिरे, अश्विनी दापोरकर यांनी शाखेच्या कामाचा गौरव केला. कलाकार, महिलांना त्यात अधिक स्थान द्यावे, निधी संकलन, सभासद संख्या वाढवावी आदी सूचना सभासदांनी केल्या. नाशिकमधील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानावरून दत्ता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजेंद्र सोमवंशी यांनी केले. आभार हर्षल भामरे यांनी मानले. (फोटो ०२ मसाप)