शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

प्राथमिक आरोग्य केंद्रातही कोविड सेंटर करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 10:53 PM

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना दाखल करण्यासाठी खाटा मिळत नाहीत. त्यामुळे उपचाराविना त्यांची हेळसांड होऊन परिणामी मृत्युमुखी पडावे लागत असल्याने ग्रामीण भागातील बाधित रुग्णांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याच्या अखत्यारितील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्देस्थायी समितीचा निर्णय : ऑक्सिजन, इतर साहित्याचा पुरवठा

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना दाखल करण्यासाठी खाटा मिळत नाहीत. त्यामुळे उपचाराविना त्यांची हेळसांड होऊन परिणामी मृत्युमुखी पडावे लागत असल्याने ग्रामीण भागातील बाधित रुग्णांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याच्या अखत्यारितील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची ऑनलाईन सभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयत्या विषयांवर चर्चा करताना जवळपास सर्वच सदस्यांनी ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली.

आत्माराम कुंभार्डे यांनी ग्रामीण व शहरी भागात कोठेही रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होत नसल्याचे सांगून भविष्यात हीच परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याचे सांगितले. रुग्णांना दाखल करण्यास जागा तर नाहीच परंतु त्यावर उपचार म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच ऑक्सिजनही मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात आले. तर अध्यक्ष क्षिरसागर यांनी ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांची तयारी असेल तर त्यांना कोविड रुग्णांवर उपचाराची परवानगी देण्यास हरकत नसल्याचे सांगितले किंवा खासगी रुग्णालयातील ५० ते ६० टक्के खाटा राखीव ठेवता येतील काय याचीही चाचपणी करण्याची सूचना केली.जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले असले तरी, ते अपुरे पडू लागल्याने सर्वच प्रा‌थमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड सेंटर सुरू करून रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात यावी. त्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर व इतर साहित्य खरेदीस जिल्हा परिषदेने मान्यता द्यावी अशी सूचना कुंभार्डे यांनी केली.

त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर यांनी सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये तशी व्यवस्था केल्यास नॉनकोविड रुग्णांची गैरसोय होणार असल्याचे सांगितले. त्यापेक्षा ज्या तालुक्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या अधिक आहे त्या तालुक्यात अधिकाधिक प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा प्रकारची सोय करता येऊ शकेल. त्यासाठी आजच अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.सावरगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईयेवला तालुक्यातील सावरगाव प्रा‌थमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू असतानाही दोघे वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याची तर एक वैद्यकीय अधिकारी अनधिकृत गैरहजर असल्याची तक्रार सविता पवार यांनी केली असता, अनधिकृत गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस बजावून त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेर यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल