शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आज उमेदवारांच्या भाग्याचा फैसला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 1:13 AM

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये गुरुवारी (दि. २४) सकाळी आठ वाजता मतमोजणीची सुरुवात होणार आहे. गुरुवारीच उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ठरणार आहे. निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

चांदवड/देवळा : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये गुरुवारी (दि. २४) सकाळी आठ वाजता मतमोजणीची सुरुवात होणार आहे. गुरुवारीच उमेदवारांच्या भाग्याचा फैसला ठरणार आहे. निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.मतमोजणी कक्षाची पूर्ण तयारी झालेली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली आहे. मतदान कक्षात मोबाइल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. चांदवड विधानसभा मतदारसंघामध्ये २९४ मतदान केंद्रांची मतमोजणी २१ फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे.मतमोजणी कक्षामध्ये फेरीनिहाय मतमोजणी करण्यासाठी १४ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली असून, पोस्टल बॅलेटची मोजणी स्वतंत्र टेबलवर होणार आहे. फेरीनिहाय मतमोजणी झाल्यानंतर त्वरित भारत निवडणूक आयोगाच्या सुविधा या पोर्टलवर मतमोजणीची माहिती सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे.मतमोजणीसाठी आवश्यक असणाºया सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेलेअसून, उमेदवारांनादेखील त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मतमोजणीकक्षामध्ये उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, यांना आवश्यक ओळखपत्रे वितरित करण्यात आलेली आहेत. तसेच मतमोजणीची माहिती प्रसार माध्यमांना पोहोचविण्यासाठी मीडिया कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. संपूर्ण मतमोजणी परिसरामध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वैध ओळखपत्राशिवाय कुणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, तसेच मतमोजणी कक्षामध्ये मोबाइलबंदी असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी सांगितले आहे. मतमोजणीसाठी भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक पी.टी. साधू उपस्थित राहणार आहेत.निफाड मतमोजणीसाठी १४ टेबलनिफाड : निफाड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, निफाड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीपक पाटील, प्रशासन नायब तहसीलदार योगेश शिंदे, संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार पूनम दंडीले आदी अधिकारी मतमोजणीवर लक्ष ठेवून असणार आहेत. निफाड विधानसभा मतदारसंघासाठी ७५.१३ टक्के मतदान झाले. एकूण २,७१०५६ मतदारांपैकी २,०३६५१मतदारांनी हक्क बजावला. जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान निफाड मतदारसंघात झाले.निफाड येथील पिंपळगाव बसवंत रोडवरील मोरे महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. मतमोजणीसाठी १४ टेबल मांडण्यात आले आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहायक पर्यवेक्षक, एक निरीक्षक, एक शिपाई असे चौघांचे पथक नेमण्यात आले आहे. या ठिकाणी पोस्टल मतदानासाठी एक आणि मॅन्युएल मोजणी तपासणीसाठी एक असे दोन स्वतंत्र टेबल ठेवण्यात येणार आहेत. मतमोजणीच्या एकूण वीस फेºया असून, बाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना फेरीनिहाय निकाल लाउड- स्पीकरवरून सांगण्यात येणार आहे.अशी होणार मतमोजणी...४ मतमोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघात १४ टेबल्सवर मोजणी होणार आहे. दिंडोरी मतदारसंघात मात्र १२ टेबल्सवर मतमोजणी केली जाणार आहे. लोकसभेप्रमाणेच प्रथम टपाली मतदानाची मोजणी तसेच सैनिकांनी पाठविलेल्या इटीपीबीएस मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे. एका स्वतंत्र टेबलवर सदर मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल. प्रत्येक फेरी २० मिनिटांची असणार आहे. प्रत्येक मतमोजणी टेबलवर पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक आणि सूक्ष्म निरीक्षक तसेच एका शिपायाची नेमणूक करण्यात आलेली आहे. या दोन्ही मतमोजणीच्या प्रक्रियेनंतर ईव्हीएममधील मतदानाच्या मोजणीस सुरुवात होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर एकाचवेळी मतमोजणी केली जाणार आहे. गुरुवारी सकाळी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची पुन्हा सरमिसळ करून त्यांना टेबल अ‍ॅलॉट केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना मतमोजणी केंद्रे अलॉट करण्यात आले आहेत.जिल्हाधिकाºयांकडून पाहणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी सकाळी नांदगाव आणि येवला येथील मतमोजणी केंद्रांना भेटी देऊन तेथील मतमोजणी नियोजनाची पाहणी केली. मतदानानंतर दोन दिवसांत जिल्हाधिकाºयांनी सर्वच मतमोजणी केंद्रांची पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आढावा घेतला. मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाºयांना गुरुवारी सकाळी ५ वाजता त्यांचे टेबल्स अलॉट केले जाणार आहेत. निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाºयांना संयम पाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मतमोजणीदरम्यान कोणत्याही प्रकारची घाई करता कामा नये. निकाल लवकर लागण्यापेक्षा तो अचूक लागावा यासाठी कर्मचाºयांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांनी निर्माण झालेल्या शंकेचे निरसन केल्याशिवाय पुढच्या मोजणीला सुरुवात करू नये, अशा सूचनादेखील त्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.इगतपुरीसाठी २१ फेºयाघोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील २८८ मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाची मोजणी नाशिकच्या शासकीय कन्या विद्यालयात गुरुवारी सकाळी होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तेजस चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी करण्यात येईल. दोन्ही तालुक्यात निकालाबाबत प्रचंड उत्सुकता असून, यासाठी मोठी गर्दी होणार आहे. पोलिसांनी गर्दीसाठी बंदोबस्त तैनात केला आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातीसाठी जागा आरक्षित आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार निर्मला गावित महायुतीतर्फेनशीब अजमावत आहेत. २१ तारखेला २८८ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. गुरुवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या कन्या विद्यालयात मतमोजणी होत आहे. मतमोजणीसाठी २१ फेºया होतील. एका फेरीत १४ टेबलवर एकाचवेळी मतमोजणी होणार आहे. पोस्टल मतदान मोजणीसाठी अतिरिक्त २ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.पावसाचे सावटजिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाने झोडपून काढले असून, आगामी चोवीस तासांत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने मतमोजणीच्या दिवशीदेखील पावसाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाचा एकूणच अंदाज लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या ठिकाणी सर्वप्रकारची खबरदारी घेतली आहे. ज्या ठिकाणी मंडप टाकण्यात आलेले आहेत तेथील मंडप हे वॉटरप्रूफ करण्यात आले आहेत. पावसामुळे मतदान केंद्रांच्या परिसरात चिखल तसेच पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत.निवडणूक रिंगणातील उमेदवार संख्यामतदारसंघ उमेदवारांची अपक्षांचीसंख्या संख्यानांदगाव १५ ११मालेगाव (मध्य) १३ १०मालेगाव (बाह्य) ०९ ०६बागलाण ०६ ०३कळवण ०६ ०१चांदवड ०९ ०४येवला ०८ ०३सिन्नर ०९ ०३निफाड ०६ ०१दिंडोरी ०५ ००नाशिक पूर्व १२ ०७नाशिक मध्य १० ०४नाशिक पश्चिम १९ ११देवळाली १२ ०४इगतपुरी ०९ ०४

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक