ब्राह्मणगावी शेतकऱ्यांसाठी कर्जवाटप मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:01 IST2020-08-12T22:55:00+5:302020-08-13T00:01:26+5:30
ब्राह्मणगाव : येथील श्रीराममंदिरात शेतकऱ्यांसाठी कर्जवाटप मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात जिल्हा बँकेचे बँक निरीक्षक के. एन. कोर यांनी शेतकºयांना कर्जवाटपाबाबत माहिती देताना लखमापूर, ब्राह्मणगाव, धांद्री, यशवंतनगर येथील शेतकºयांना चाळीस लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती दिली.

ब्राह्मणगावी शेतकऱ्यांसाठी कर्जवाटप मेळावा
ब्राह्मणगाव : येथील श्रीराममंदिरात शेतकऱ्यांसाठी कर्जवाटप मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात जिल्हा बँकेचेबँक निरीक्षक के. एन. कोर यांनी शेतकºयांना कर्जवाटपाबाबत माहिती देताना लखमापूर, ब्राह्मणगाव, धांद्री, यशवंतनगर येथील शेतकºयांना चाळीस लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती दिली.
याप्रसंगी बँक आॅफ बडोदा शाखेचे शाखाधिकारी शिवम गुप्ता व कृषी अधिकारी यशवंत आंधळे, जिल्हा बँक शाखाधिकारी परदेशी यांनी शेतकºयांना कर्जवाटपाबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा बँकेचे माजी चेअरमन राघो अहिरे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. नरेंद्र अहिरे, अरुण अहिरे, मोठा भाऊ अहिरे, रोहिणी अहिरे, अभय अहिरे यांनी शेतकºयांच्या समस्या मांडल्या.