शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकृष्ण मंदिरावरून वाद

By admin | Updated: October 23, 2016 22:56 IST

वणी : तंटामुक्त समितीचा विषय ग्रामसभेत

वणी : तंटामुक्त समितीच्या उपाध्यक्षांनी भगवती कॉलनीतील श्रीकृष्ण मंदिर पाडण्याचा इशारा ग्रामसभेत दिला असून, तशा आशयाची नोंद ठरावात करण्यात आली आहे. वणी येथे भगवती कॉलनीतील महिला वर्गाने लोकवर्गणीतून सुमारे तीन वर्षांपूर्वी श्रीकृष्ण मंदिर बांधले आहे. भावभक्तीपूर्ण वातावरणात प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिवत पार पडल्यानंतर प्रतिदिन नित्यनेमाने पूजाविधी व विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे कॉलनीत मंगलमय वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, मंदिरालगत मुलांचे वसतिगृह असून, मंदिर परिसरातील सार्वजनिक टाकीतील पाण्याचा वापर वसतिगृहातील विद्यार्थी करतात. धुतलेले कपडे मंदिराच्या तार कंपाउंडवर वाळत टाकणे तसेच जेवणाचे ताट धुणे यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून मंदिराची स्वच्छता व पावित्र्य यावर प्रतिकूल परिणाम होतो, अशी श्रीकृष्ण व्यवस्थापन समितीची भूमिका, तर विद्यार्थ्यांना पाणी वापरास प्रतिबंध करण्यात येतो हा वसतिगृहाचा मुद्दा. दरम्यान, आपसातील वाद सामंजस्याने मिटविणे अपेक्षित होते. सदरची घटना घडल्यानंतर ग्रामपालिकेने हा ठराव प्रत देणेबाबत आढेवेढे घेतले. जागृत नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर वास्तव माहितीची ठरावाची प्रत देण्यात आली. सतीश दिलीप जाधव यांच्यावर वणी पोलीस ठाण्याच्या कामकाजात अडथळा आणल्या-प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच नोंदणीकृत संस्थेचा क्रमांक वापरून बेकायदेशीर वस्तू विक्र ी वाढ़ योजना चालविल्याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. (वार्ताहर)ग्रामसभेच्या ठरावावर उल्लेखतंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष सतीश दिलीप जाधव यांनी ग्रामसभेत हा विषय नेला. सदरच्या बाबीवर चर्चा सुरू झाली. त्यात सतीश जाधव व श्रीकृष्ण व्यवस्थापन समितीच्या सदस्य यांच्यात या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, व्यवस्थापन समितीने याबाबत सुधारणा केली नाही तर आम्ही भगवती कॉलनी येथील श्रीकृष्ण मंदिरच पाडून टाकू, असे धक्कादायक व प्रक्षोभक विधान केले. या मुद्द्यावरून गदारोळ झाला. विशेष बाब म्हणजे, ग्रामसभेच्या ठरावावर स्पष्टपणे तसा उल्लेख ग्रामविकास अधिकारी जी. आर. आढाव यांच्या स्वाक्षरीनिशी आहे.