नांदगाव तालुक्यात वीज पडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 17:57 IST2018-11-05T17:55:13+5:302018-11-05T17:57:37+5:30

नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे येथे वीज पडून माधव भानुदास सदगिर (१९) रा. पिंप्राळे या युवकाचा मृत्यू झाला.

Death of youth in Nandgaon taluka falls due to electricity | नांदगाव तालुक्यात वीज पडून युवकाचा मृत्यू

नांदगाव तालुक्यात वीज पडून युवकाचा मृत्यू

माधव हा रात्री ८ वाजता दुचाकीने गावी जात असतानाच रस्त्यातील वडाच्या झाडानजीक अचानक वीज पडून जखमी झाला. त्यास उपचारार्थ नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. रोहन बोरसे यांनी मृत घोषित केले. त्याच्या पश्चात भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. माधव हा शेतकरी कुटुंबातील होता. दरम्यान, तालुक्यात झालेल्या बेमोसमी पावसाने कांदा पिकाला जीवदान मिळाले असले तरी कोरडा चाऱ्याचे भिजून नुकसान झाले. पावसात तालुक्यात नांदगाव सात, हिसवळ दोन, वेहळगाव ११, जातेगाव चार मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Death of youth in Nandgaon taluka falls due to electricity