आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 18:51 IST2020-08-26T18:50:52+5:302020-08-26T18:51:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क येवला : तालुक्यातील देवदरी येथील विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरूणाचा अखेर औषधोपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरूणाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : तालुक्यातील देवदरी येथील विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरूणाचा अखेर औषधोपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
देवदरी येथील ज्ञानेश्वर काशिनाथ दाणे (३२) या तरूणाने मंगळवारी (दि.१८) शेतीसाठी वापरल्या जाणारे क्विनो फॉस्फेट हे विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही बाब घरातल्या मंडळींच्या लक्षात येताच अत्यावस्थ अवस्थेतील ज्ञानेश्वर यास येवला शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी (दि. २५) ज्ञानेश्वरची प्राणज्योत मालवली. तालुका पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार अल्ताफ शेख हे करीत आहेत.