बंधाऱ्यात बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:57 IST2018-09-07T23:29:44+5:302018-09-08T00:57:37+5:30
सिन्नर- शिर्डी महामार्गालगत सामाजिक वनीकरणाच्या पाठीमागे देवनदीवर असलेल्या बंधाºयात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

बंधाऱ्यात बुडून युवकाचा मृत्यू
सिन्नर/मुसळगाव : सिन्नर- शिर्डी महामार्गालगत सामाजिक वनीकरणाच्या पाठीमागे देवनदीवर असलेल्या बंधाºयात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. प्रशांत अण्णासाहेब तांबे (२१) हल्ली रा. मुसळगाव फाटा ता. सिन्नर (मूळ रा. श्रीरामपूर जि. अहमदनगर) हा युवक मुसळगाव औद्योगिक वसाहतीत कारखान्यात काम करतो. तो त्याच्या मित्रांसोबत शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास देवनदीवर असलेल्या वनीकरणाच्या पाठीमागील बंधाºयाकडे पोहण्यासाठी गेले होते. प्रशांत बंधाºयात पोहत असतांना दम लागल्याने तो बुडू लागला. सोबत असलेल्या दोन मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळच शिंदे वस्तीवर काम करणाºया महिलांच्या सदर प्रकार लक्षात आला.