देवगाव येथील तरुणाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 18:39 IST2019-10-18T18:33:17+5:302019-10-18T18:39:37+5:30

देवगाव येथील तरुणाचा पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तुषार बाळू भड (२६) हा तरुण गेल्या काही दिवसांपासून मजुरीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास होता.

The death of a young man in Devgaon | देवगाव येथील तरुणाचा बुडून मृत्यू

देवगाव येथील तरुणाचा बुडून मृत्यू

देवगाव : येथील तरुणाचा पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तुषार बाळू भड (२६) हा तरुण गेल्या काही दिवसांपासून मजुरीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास होता.
नेहमीप्रमाणे कामाहून सुटी झाल्यानंतर घराकडे जात असताना इंद्रायणी नदीत एक जण बुडत असल्याचे त्याने पाहिले. त्याला वाचवण्यासाठी तुषार व राहुल माने यांनी नदीत उडी घेतली. मात्र पाण्यात दम लागल्याने तुषार बुडाला. त्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथकाला बोलाविले होते. शोधमोहिमेनंतर तुषारचा मृतदेह सापडला. तुषार हा एकुलता एक होता. बातमी गावात पसरताच शोककळा पसरली.

Web Title: The death of a young man in Devgaon