इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:12 IST2018-04-29T00:12:40+5:302018-04-29T00:12:40+5:30

इमारतीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू
नाशिक : दुपारच्या जेवणानंतर डुलकी लागल्याने इमारतीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२७) हिरावाडीतील कमलनगरमध्ये घडली़ प्रदीप उल्लूसिंग (२५, रा. हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक) असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे.पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरावाडीतील कमलनगर येथे असलेल्या गोकुळधाम सोसायटीत काम सुरू आहे. या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास प्रदीप व त्याच्या सहकाऱ्यांनी जेवण केले व थोडावेळ गप्पाही मारल्या़ यानंतर इतर सहकारी कामावर गेले असता प्रदीपला डुलकी लागली व तो जमिनीवर पडला़ यामध्ये डोक्यास व पायास गंभीर दुखापत झालेल्या प्रदीपला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़