बाल्कनीतून पडल्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:57 IST2018-11-01T01:56:31+5:302018-11-01T01:57:03+5:30

फ्लॅटच्या बाल्कनीत स्टूलवर उभे राहून साफसफाई करणाऱ्या विवाहितेचा तोल जाऊन पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जयभवानीरोड येथे सदर प्रकार घडला.

 Death of a woman due to falling from the balcony | बाल्कनीतून पडल्याने महिलेचा मृत्यू

बाल्कनीतून पडल्याने महिलेचा मृत्यू

नाशिकरोड : फ्लॅटच्या बाल्कनीत स्टूलवर उभे राहून साफसफाई करणाऱ्या विवाहितेचा तोल जाऊन पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जयभवानीरोड येथे सदर प्रकार घडला.  जाचक मळा येथील हरिवैभव सोसायटीत चौथ्या मजल्यावर राहणारी विवाहिता ज्योत्स्ना नितीन महाजन (३३) या बुधवारी सकाळी बाल्कनीमध्ये साफसफाईचे काम करीत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने त्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे हरिवैभव सोसायटीतील रहिवासी व विशेष करून महिलांना मोठा धक्का बसला होता. मयत ज्योत्स्ना यांचे पती नितीन महाजन हे जम्मू-काश्मीरमध्ये लष्करात अधिकारी म्हणून कार्यरत असून, सुट्टीमुळे १० दिवसांपूर्वीच ते घरी आले आहे. मयत ज्योत्स्ना यांचा मुलगा आयुष ९ वी तर मुलगी अनन्या ५ वी इयत्तेत शिक्षण घेत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  Death of a woman due to falling from the balcony