दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:26 IST2018-08-23T00:26:30+5:302018-08-23T00:26:49+5:30

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़

 The death of two in two different situations | दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

नाशिक : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ मडकीजांब येथील रहिवासी अंबादास निवृत्ती गायकवाड (३५) यांनी विषारी औषध सेवन केले़ दुपारी २ वाजेच्या सुमारास ते उमराळे फाट्यावर बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने त्यांचे भाऊ सुरेश गायकवाड यांनी उपचारासाठी प्रथम दिंडोरी ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़राहुल पाटील यांनी मयत घोषित केले़  देवरगाव आश्रमशाळेत अकरा वर्षीय मुलाचा चक्कर आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. नीलेश संतोष फसाळे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. नीलेश यास चक्कर आल्याने अधीक्षक सुनील बोरकर यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़

Web Title:  The death of two in two different situations

टॅग्स :Deathमृत्यू