मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या पत्राने खळबळ
By संजय पाठक | Updated: February 10, 2024 08:21 IST2024-02-10T08:20:58+5:302024-02-10T08:21:38+5:30
या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि भुजबळ समर्थकांनी पोलीस बंदोबस्त वाढवून देण्याची मागणी केली

मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या पत्राने खळबळ
संजय पाठक
नाशिक- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली
आहे. या धमकी पत्रानंतर भुजबळ यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भुजबळ यांचे निवासस्थान व कार्यालय येथे हे धमकीचे पत्र
शुक्रवारी (दि.९) मिळाले आहे.
या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि भुजबळ समर्थकांनी पोलीस बंदोबस्त वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार दोन पोलीस अधिकारी, अंबड पोलीस ठाण्याचे १० आणि आरसीबीचे १० पोलीस कर्मचारी भुजबळ फार्म येथे तैनात करण्यात आले आहेत. भुजबळ यांना
यापूर्वीही अशाच प्रकारे जीवे मारण्याची धमकी देणारे फोन कॉल्स आणि मॅसेज आले होते. आताही पत्र आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.