पाझर तलावात बूडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: October 6, 2015 00:05 IST2015-10-06T00:05:02+5:302015-10-06T00:05:20+5:30
पाझर तलावात बूडून विद्यार्थ्याचा मृत्यू

पाझर तलावात बूडून विद्यार्थ्याचा मृत्यू
त्र्यंबकेश्वर : परिसरातील पिंप्री (त्र्यबंक) येथील अनुदानित आश्रमशाळेत नववीत शिकणार्या विद्यार्थ्याचा सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. अरुण प्रकाश महाले असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो गणेशगाव येथील विनायकनगर येथे राहत होता.
दोन-तीन दिवसांपूर्वी परिसरात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. दरम्यान वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पाणीपुरवठाही बंद असल्याने येथील प्रकाश महालेसह काही विद्यार्थी अंघोळीसाठी पाझर तलावावर गेले. यावेळी काही विद्यार्थी अंघोळ आटोपून बाहेर आले; मात्र प्रकाशला खोलीचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच त्र्यंबक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह बाहेर काढला. पंचनाम्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला. दरम्यान, ग्रामस्थांनी प्रकाशच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्र्यंबक पोलिसांकडे एका निवदेनाच्या माध्यामातून केली आहे. (वार्ताहर)