साकोऱ्यातील अपघातग्रस्त तरूणाचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 13:08 IST2018-09-28T13:06:02+5:302018-09-28T13:08:39+5:30
साकोरा : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात जखमी झालेल्या ऋ षिकेश निकम (२०) या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

साकोऱ्यातील अपघातग्रस्त तरूणाचे निधन
साकोरा : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात जखमी झालेल्या ऋ षिकेश निकम (२०) या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. साकोरा येथील राजेंद्र निकम यांचा मुलगा ऋ षिकेश (२०) आणि त्याचा मित्र आनंद निकम हे दोघे पंधरा दिवसांपूर्वी पल्सर गाडी नंबर एम. एच ४१ ए.एक्स. ०३७३ या दुचाकीवरून नांदगाव मालेगाव रस्त्यावरील न्यू.इंग्लिश स्कुलजवळ गाडी दुरूस्तीसाठी जात असतांना अचानक समोरून आलेल्या गाडीला चुकवून दुचाकी घसरल्याने दोघांनाही मार लागला होता.पैकी ऋ षिकेश याच्या डोक्याला जबर मार लागल्याने नांदगाव येथील खाजगी रु ग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले होते.मात्र पुढील उपचारासाठी सर्व मित्रांनी वर्गणी जमा करून २५ हजार रूपये जमा करून मालेगाव येथे दाखल केले होते. तेथेही त्याने प्रतिसाद न दिल्याने त्यानंतर मुंबईला हलविण्यात आले मात्र उपचारारादरम्यान ऋषिकेशचा मृत्यू झाल्याचे समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गुरूवारी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.