चास शिवारात सर्पदंशाने तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 14:24 IST2019-02-04T14:24:34+5:302019-02-04T14:24:44+5:30

सिन्नर : तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे शेतातील पिकांना पाणी देत असतांना तरूणाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

 Death of a serpent by the snake in the Chas Shivar | चास शिवारात सर्पदंशाने तरूणाचा मृत्यू

चास शिवारात सर्पदंशाने तरूणाचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे शेतातील पिकांना पाणी देत असतांना तरूणाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. नितीन संपत भाबड (वय ३६) असे मृत तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास स्वत:च्या शेतात पाणी भरत असताना नितीन भाबड यांना सर्पदंश झाला. त्यांना उपचारासाठी तातडीने दोडी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पी. के. अढांगळे तपास करीत आहेत. शोकाकूल वातावरणात भाबड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title:  Death of a serpent by the snake in the Chas Shivar

टॅग्स :Nashikनाशिक