शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

नाशिकमधील कोरोनाबाधीतांचा मृत्यू दर देशातील सरासरी पेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 1:37 AM

शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. लवकरच रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्याच्या पध्दतीने नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमी झाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्या तुलनेत हा मृत्यू दर अत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देआयुक्त कैलास जाधव : बरे होण्याचे प्रमाण अधिकमंजुर रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे प्रस्तावमास्क  न लावणा-यांवर कारवाई

नाशिक- शहरात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी चाचण्यावाढविण्यात आल्या आहेत. लवकरच रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचारकरण्याच्या पध्दतीने नाशिक शहराचा मृत्यू दर पाच वरून १. ४६ इतका कमीझाला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सरासरीच्या तुलनेत हा मृत्यू दरअत्यंत कमी आहे, अशी माहिती नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनीदिली. राज्यातील कोरोना बाधीतांचा मृत्यू दर २.७० तर देशाचा १.६० इतकाआहे, त्यापेक्षा नाशिकचा मृत्यू दर कमी आहे, असेही त्यांनी सांगितले.शहरातील वाढत्या संसर्गाबाबत चिंतेचे वातावरण आहे. त्याबाबत त्यांच्याशीसाधलेला संवाद..प्रश्न- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे, त्यासंदर्भात काय सांगाल...जाधव- शहरात कोरोना बाधीतांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.कोरोनाबाधीत रूग्ण लवकर आढळल्यास त्याच्यावर लवकर उपचार सुरू होतात.त्यामुळे त्याच्या पासून अन्य कोणाला संसर्ग होणार असेल तर तो रोखलाजातो. तसेच लवकर उपचारामुळे मृत्यू दर कमी होतो. आज नाशिक शहराचा मृत्यूदर राज्याच्या आणि देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे. चाचण्यांचेप्रमाणदेखील अशाच प्रकारे खूपच अधिक आहे. दहा लाख लोकसंख्येच्या तुलनेत९२ हजार ७६९ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पुण्याच्या तुलनेतया चाचण्या खूप असल्या तरी ही शहरे अत्यंत मोठी आहेत. त्यामुळेत्यांच्याशी थेट तुलना होत नसला तरी एकुणच चाचण्या वाढवणे ही खूपचमहत्वाची बाब आहे त्यामुळे मृत्यू दर कमी झाला आहे सर्वात महत्वाचेम्हणजे बरे होणाºयांचे प्रमाण वाढले आहे. आठ दिवसांपूर्वी शहरात सहा हजारअ‍ॅक्टीव रूग्ण होते आता ते ४३०० आहेत. यातूनच रूग्ण बरे होण्याचे प्रमाणवाढल्याचे दिसते.प्रश्न- कोरोना बाधीतांची संख्या वाढत असली तरी आता ती नियंत्रणातआण्यासाठी काय उपाय आहेत?जाधव-कोरोनाच्या चाचण्यांमुळे रूग्ण वाढीचा वेग जास्त दिसतो. विशेषत:रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी राज्य आणि देशाच्या तुलनेत कमी आहे. हीचकाय ती त्रुटी आहे. महाराष्टÑात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवसआहे. देशाचा कालावधी ४५ दिवस तर नाशिक शहराचा २६ दिवस इतका आहे. अर्थात,संसर्ग कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जातआहेत. नागरीकांनी आरोग्य नियमांचे पालन करावे यासाठी कारवाई वाढविण्यातआली असून आता पोलीस आणि मनपाने संयुक्त कारवाई करावी असा प्रस्ताव आहे.मास्क लावणे, सुरक्षीत अंतराचे पालन करणे आणि हॅँडसॅनिटायझरचा वापर इतकेनियम पाळले तरी रूग्ण संख्या कमी होईल.प्रश्न- रूग्ण संख्या वाढत असताना वैद्यकिय उपचार सुविधा पुरेशा आहेत काय?जाधव- महाापालिकेने रूग्णालये आणि अन्य सुविधा दिल्या आहेत. आॅक्सिजनबेडसची संख्या वाढविली जात आहे. रूग्ण संख्या वाढली तर आॅक्सिजनची अडचणभासू नये यासाठी नाशिकरोड येथील बिटको रूग्णालय तसेच डॉ. झाकीर हुसेनरूग्णालय येथे आॅक्सिजनच्या टाक्या बसविण्यात येत आहेत. बिटको रूग्णालयातटाकी बसविण्यासाठी फाऊंडेशनचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. झाकीर हुसेनयेथेही काम सुरू होत आहे. मुख्य प्रश्न मनुष्यबळाचा आहे. सध्यातात्पुरत्या स्वरूपात कर्मचाºयांची भरती केली जात असली तरी किमान मंजुररिक्तपदे भरण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी राज्यशासनाला प्रस्ताव पाठविलाआहे. आकृतीबंधाच्या मंजुरीचे सोपस्कार नंतर केले तरी चालतील परंतुवैद्यकिय विभागात स्थायी पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे .* मुलाखत संजय पाठक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त