मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:45 IST2018-07-07T00:43:40+5:302018-07-07T00:45:40+5:30
नाशिक : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या इसमाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि़५) सकाळच्या सुमारास आडगाव शिवारातील धात्रक फाट्याजवळ घडली़ रामकृष्ण नारायण बोराडे (वय ४०, रा.अमृतधाम) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या इसमाचा मृत्यू
नाशिक : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या इसमाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि़५) सकाळच्या सुमारास आडगाव शिवारातील धात्रक फाट्याजवळ घडली़ रामकृष्ण नारायण बोराडे (वय ४०, रा.अमृतधाम) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़
बोराडे हे सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नेहेमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले़ धात्रक फाट्याकडे जात असताना मदर तेरेसा चौकाजवळ ते अचानक चक्कर येऊन पडले असता भाऊ विजय बोराडे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़