न्हनावे येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:13 IST2018-04-09T00:13:43+5:302018-04-09T00:13:43+5:30
चांदवड : विहिरीत पडलेला पाइप काढण्यासाठी तरुण विहिरीत उतरत असताना दोर सुटून बुडून मरण पावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

न्हनावे येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू
चांदवड : तालुक्यातील न्हनावे शिवारात विहिरीत पडलेला पाइप काढण्यासाठी ४० वर्षीय तरुण विहिरीत दोराच्या साहाय्याने उतरत असताना अचानक दोर सुटून तो विहिरीत पडून बुडून मरण पावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी (दि. ८) दुपारी एक वाजेच्या सुमारास न्हनावे शिवारात राजेंद्र नामदेव दंवडे (४०) हे त्याचे विहिरीत पाइप पडल्याने काढण्यासाठी अंगाला दोर बांधून विहिरीत उतरत असताना त्यांच्या हातातील दोर सुटून ते विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू पावले, अशा आशयाची खबर खंडेराव जयराम वाघ (रा. न्हनावे) यांनी चांदवड पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहिते करीत आहेत.