पांगरी येथे विहिरीत पडून वृध्देचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 17:17 IST2018-09-25T17:16:26+5:302018-09-25T17:17:25+5:30
सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील हौसाबाई संपत पगार (८०) या वृध्देचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

पांगरी येथे विहिरीत पडून वृध्देचा मृत्यू
हौसाबाई पगार या पांगरी गावातून घरी मळ्यात जात असताना रस्त्याच्या कडेला असलेली विहिरीचा अंदाज न आल्याने त्या तोल जाऊन विहिरीत पडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सकाळी विहिरीजवळ विद्युत जलपंप सुरु करण्यासाठी गेल्यानंतर सदर प्रकार लक्षात आला. पगार यांचा मळा पांगरी- मिठसागरे रस्त्यालगत आहे. कामानिमित्त त्या पांगरी गावात आल्या होत्या. घरी जात असताना ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, चार मुली, सूना व नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप शिंदे, रमेश केदार अधिक तपास करीत आहे.