ट्रकवर झोपलेल्या इसमाचा खाली पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 14:14 IST2019-02-06T14:14:12+5:302019-02-06T14:14:24+5:30
सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महावीर गोडोवून समोर ट्रकवर झोपलेला एकजण खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

ट्रकवर झोपलेल्या इसमाचा खाली पडून मृत्यू
सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महावीर गोडोवून समोर ट्रकवर झोपलेला एकजण खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चालक शिवानंद पांडुरंग मुळगे (रा. राठोडा, ता. निलंगा, जि. लातूर) हा ट्रक मागे घेत असताना ट्रकवर झोपलेला सुरेश कमालकर शिंदे (३८) हा खाली पडून गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना जखमी सुरेश यांचा मृत्यू झाला. सदरचा अपघात २८ जानेवारी रोजी झाला होता. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात चालक मुळगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ हे तपास करीत आहे.