टाकेदला शॉक लागुन बैलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 17:24 IST2018-09-02T17:24:15+5:302018-09-02T17:24:51+5:30
ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील टाकेद खुर्द येथील ा शेतकऱ्याच्या बैलाला स्टे-वायरचा ( पोलला दिलेला तान ) शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू होऊन सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले. या बाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टाकेदला शॉक लागुन बैलाचा मृत्यू
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील टाकेद खुर्द येथील ा शेतकऱ्याच्या बैलाला स्टे-वायरचा ( पोलला दिलेला तान ) शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू होऊन सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले. या बाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. टाकेद खुर्द येथील शेतकरी भाऊराव नाना शिंदे (६५) हे शनिवारी दुपारी सव्वा चार वाजता आपल्या स्वत:च्या गट नं,२१२ या शेतामध्ये बैल चारत होते. त्यांच्या शेतातूनच ११ के.व्ही.ही उच्च दाबाची विद्युत लाईन गेलेली आहे. या लाईन वरील एका पोलला तान ( स्टे) दिलेला आहे. या स्टे जवळ शिंदे यांचा बैल चरत-चरत गेला असता अचानक त्याचा त्या स्टे वायरला स्पर्श झाला व त्यामध्ये बैलाचा एक पाय अडकला. बैलाचा धनी बैलाला सोडवण्यासाठी गेला असता त्यांनाही करंट बसला व ते पटकन बाजुला झाले, अन्यथा त्यांच्याही जिवावर बेतले असते. प्रसंगावधान ओळखुन त्यांनी लाईनमन वसंत बोडके यांना फोन द्वारे कळवून लगेच विद्यूत पुरवठा खंडीत केला.व सर्वांना माहिती दिली. घोटी ग्रामीणचे कनिष्ट अभियंता राणे ,पशुवैद्यकीय विभागाचे टोचे यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी पंचनामो. स्थानिक कार्यकर्ते बहीरू लगड, कैलास पांडे, संजय लगड, रामदास शिंदे यांनी योग्य ते सहकार्य केले . (फोटो ०२ टाकेद )