शिर्डी महामार्गावरील अपघातातील जखमीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 17:53 IST2019-01-16T17:53:04+5:302019-01-16T17:53:13+5:30
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महार्गावरील पांगरी शिवारात झालेल्या कार - लुना अपघातातील जखमीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

शिर्डी महामार्गावरील अपघातातील जखमीचा मृत्यू
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महार्गावरील पांगरी शिवारात झालेल्या कार - लुना अपघातातील जखमीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील मिठसागरे येथील सूर्यभान शंकर कासार (७२) असे मृताचे नाव आहे. कारने (एम.एच. ०२ डी. जी. १७३०) समोरून येणाऱ्या लुनाला (एम. एच. १५ ए. जे. ३७४८)
जोराची धडक दिली होती. यात दुचाकीस्वार सूर्यभान कासार गंभीर जखमी झाले होते. तीन जानेवारीला सदरचा अपघात झाला होता. उपचार सुरू असताना कासार यांचा मृत्यू झाला. याबाबत वावी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.