झोक्याचा फास बसून दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:36 IST2018-03-12T01:36:15+5:302018-03-12T01:36:15+5:30

सिडको : घरात मुलींसोबत झोका खेळत असताना अचानक दोरी तुटून त्याचा फास बसल्याने दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़११) दुपारी चुंचाळे शिवारात घडली़ तितिक्षा किरण राऊळ (रा. रो-हाऊस नंबर ५७३, जाधव टाऊनशिप, चुंचाळे शिवार, नाशिक) असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे़ या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

The death of the 10-year-old daughter by hanging herself | झोक्याचा फास बसून दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

झोक्याचा फास बसून दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

ठळक मुद्देचुुंचाळे शिवारातील घटना घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद

सिडको : घरात मुलींसोबत झोका खेळत असताना अचानक दोरी तुटून त्याचा फास बसल्याने दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़११) दुपारी चुंचाळे शिवारात घडली़ तितिक्षा किरण राऊळ (रा. रो-हाऊस नंबर ५७३, जाधव टाऊनशिप, चुंचाळे शिवार, नाशिक) असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे़ या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरातील बेडरूममध्ये बांधलेल्या झोक्यावर तितिक्षासह आणखी दोन मुली झोका खेळत होत्या़ दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास झोक्याचा एक पदर तुटला व त्याचा फास तितिक्षाच्या गळ्याभोवती बसला़ ही बाब लक्षात येताच तिचे वडील किरण राऊळ यांनी तिला उपचारासाठी प्रथम घराजवळील खासगी रुग्णालय व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ गायधनी यांनी तपासून मयत घोषित केले़
पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेले किरण राऊळ यांची तितिक्षा ही मुलगी आहे़ या घटनेमुळे जाधव टाऊनशिप परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वीच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील आदिवासी पाड्यावरील बारा वर्षीय मुलीचा झोका खेळत असताना गळफास बसून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती़सिडको परिसरात यापूर्वी एका लहान मुलाच्या घशात रबराचा फुगा अडकल्याने तर नाशिकरोड परिसरात दहा रुपयांचे नाणे घशात अडकल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती़ लहान मुले घरात खेळत असताना पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़
- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड

Web Title: The death of the 10-year-old daughter by hanging herself

टॅग्स :Policeपोलिस