सावत्र बापानेच केला मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 00:50 IST2021-03-01T00:49:14+5:302021-03-01T00:50:17+5:30

निफाड तालुक्यातील बेहड येथे एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर  अत्याचार करून नात्याला काळिमा फासला आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार पोस्कोअंतर्गत संशयितावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The daughter was tortured by her stepfather | सावत्र बापानेच केला मुलीवर अत्याचार

सावत्र बापानेच केला मुलीवर अत्याचार

ठळक मुद्देनात्याला काळिमा फासणारी घटना

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील बेहड येथे एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर  अत्याचार करून नात्याला काळिमा फासला आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार पोस्कोअंतर्गत संशयितावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईशी काही वर्षांपासून संशयितांचे प्रेमसंबंध होते. बेहेड येथील राहत्या घरी घरात कुणी नसल्याची संधी साधून या सावत्र बापाने पीडित मुलीवर  बळजबरी  करत अत्याचार केला. सदर घटनेची माहिती  पीडित मुलीने मावशीला सांगितली. मावशीने पीडितेला घेऊन थेट पिंपळगाव पोलीस ठाणे गाठून सदर घटनेची तक्रार दिली. त्यामुळे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदविण्यात आला आहे.
संशयितावर  शनिवारी रात्री उशिरापर्यंत बाललैंगिक अत्याचार, पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात  आला. काही तासांत त्याला बेड्या ठोकल्या. नाशिक ग्रामीण पोलीस उपअधीक्षक  अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Web Title: The daughter was tortured by her stepfather