शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

सभापतींच्या कन्येलाच डेंग्यूची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:28 PM

सिडको प्रभागाचे सभापती व प्रभाग क्रमांक ३१ चे नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या मुलीलाच डेंग्यूची लागण झाल्याने प्रभागातील अनारोग्य आणि अस्वच्छतेच्या कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे,.

पाथर्डी फाटा : सिडको प्रभागाचे सभापती व प्रभाग क्रमांक ३१ चे नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या मुलीलाच डेंग्यूची लागण झाल्याने प्रभागातील अनारोग्य आणि अस्वच्छतेच्या कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे,.  गेले अनेक महिने वासननगरमध्ये स्वच्छता कर्मचारी व धूर आणि औषध फवारणी कर्मचाºयांचे दर्शनच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशांतनगरमध्ये कधीतरी दिसणारे कर्मचारी नेमके कोणते औषध फवारतात, त्याचे प्रमाण किती व कधी फवारतात यांविषयी नागरिक तर सोडाच पर्यवेक्षण यंत्रणाही साशंक आहे. सध्या सर्वत्र सर्दी, खोकला, ताप, मलेरिया व डेंग्यूचे रु ग्ण आढळून येत आहेत. आता तर सिडको विभागाचे सभापती सुदाम डेमसे यांच्याच कन्येला डेंग्यूचे निदान झाल्याने सामान्य नागरिकांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सभापती डेमसे यांच्या म्हणण्यानुसार धूर व औषध फवारणीचा केवळ फार्स केला जात असून, मनपाचे मुजोर कर्मचारी व ठेकेदार याकडे गांभीर्याने बघत नाहीत. स्वच्छता व आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि ठेकेदार यांची ते आयुक्तांकडे तक्र ार करणार आहेत.