राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी तालुका उपाध्यक्षपदी दत्तात्रेय वाकचौरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:34 IST2020-10-24T23:12:39+5:302020-10-25T01:34:12+5:30
दिंडोरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिंडोरी तालुका उपाध्यक्षपदी कादवा कामगार युनियनचे अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे यांची निवड झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी तालुका उपाध्यक्षपदी दत्तात्रेय वाकचौरे
ठळक मुद्दे नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नुकतेच दत्तात्रेय वाकचौरे यांना नियुक्तीपत्र
दिंडोरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिंडोरी तालुका उपाध्यक्षपदी कादवा कामगार युनियनचे अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे यांची निवड झाली आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नुकतेच दत्तात्रेय वाकचौरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, रायुकॉ तालुकाध्यक्ष शाम हिरे , कामगार युनियनचे सरचिटणीस संतोष मातेरे, सुरेश फुगट, अजय दवंगे , सुहास गायकवाड, अजित दवंगे, चंद्रभान कदम, शिवाजी शिरसाठ, अमोल जमधडे, शिवाजी गांगोडे, प्रतीक वाकचौरे, रमेश कावळे, नामदेव कावळे, अशोक क्षिरसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.