मानोरीत दत्त जयंती सप्ताह उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 18:30 IST2020-12-31T18:29:44+5:302020-12-31T18:30:42+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दत्त जन्मोत्सव सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.

मानोरीत दत्त जयंती सप्ताह उत्साहात
ठळक मुद्देकार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दत्त जन्मोत्सव सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.
दत्त जन्मोत्सव सप्ताहानिमित्त रोजचा कीर्तनाचा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. मंगळवारी (दि. २९) दत्त जयंती उत्सव मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. बुधवारी (दि. ३०) सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी भगवान महाराज डमाळे यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. किर्तनानंतर भजनी मंडळाच्या सहकार्याने गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यांनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.