दत्ताजी पाटील स्मरणार्थ लासलगावी कीर्तन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:33 IST2019-02-04T17:33:13+5:302019-02-04T17:33:31+5:30
विद्यालयात आयोजन : धार्मिक स्थळांची स्वच्छता

दत्ताजी पाटील स्मरणार्थ लासलगावी कीर्तन सोहळा
लासलगाव : लोकनेते दत्ताजी पाटील स्मृती सोहळ्यांतर्गत लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी , विद्यार्थिनी व शिक्षकवर्ग यांच्या सहभागाने लासलगाव शहरातील विविध धार्मिक स्थळांची स्वच्छता व प्रार्थना करण्यात आली. त्याचबरोबर विद्यालयात कीर्तन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते.
कै.लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या पुतळ्यास सिताराम जगताप व प्रकाश गांगुर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करु न अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले. दत्ताजी पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ विद्यालयात कराडचे कीर्तनकार बाळकृष्ण दादा महाराज वसंतगडकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वामनराव जाधव यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीराव हरळे, प्रशांत पाटील ,सुकदेवराव पवार , मोहनराव आव्हाड, सूर्यभान होळकर ,दत्ता राजोळे,साहेबराव वाकचौरे,भास्करराव पोटे, विठ्ठलराव सोळसे ,दत्तात्रेय जगताप यांचेसह संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील ,सचिव संजय पाटील ,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचालिका नितापाटील ,पं.स.सदस्या रंजना पाटील ,मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील , शंतनू पाटील , प्राचार्य बाबासाहेब गोसावी , पर्यवेक्षक रमेश सोनवणे , मुख्याध्यापिका अनिता आहिरे ,पर्यवेक्षिका सुधा आहेर उपस्थित होते .कार्यक्र माचे सूत्रसंचलन श्रीहरी शिंदे आणि दत्तात्रेय मरकड यांनी केले. परिसरातील नागरिक कीर्तन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.