शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दास रामाचा हनुमंत नाचे...जन्मोत्सव, पालखी मिरवणूक,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:43 PM

येथिल पंचवटी परिसरातील ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात शुक्रवारी (दि.१९) हनुमान जयंतीचे औचित्य साधून जन्मोत्सव, पालखी मिरवणूक, पूजा, अभिषेक, हनुमान चालिसा पठण, महाप्रसाद वाटप आदिंसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. हनुमान जयंतीचे औचित्य साधून परिसरातील शेकडो भाविकांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेतला.

पंचवटी : येथिल पंचवटी परिसरातील ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरात शुक्रवारी (दि.१९) हनुमान जयंतीचे औचित्य साधून जन्मोत्सव, पालखी मिरवणूक, पूजा, अभिषेक, हनुमान चालिसा पठण, महाप्रसाद वाटप आदिंसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. हनुमान जयंतीचे औचित्य साधून परिसरातील शेकडो भाविकांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेतला.जुना आडगाव नाका येथे शेकडो वर्ष पुरातन असलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५ वाजता महाअभिषेक पूजन करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराचे महंत भक्तिचरणदास महाराज यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.महाआरतीनंतर भाविकांना लाडू प्रसाद वाटप करण्यात आला. सकाळी ७ वाजता १०८ सामूहिक हनुमानचालिसा पठण, ९ वाजता सुंदरकाण्ड हवन, तर दुपारी १ वाजता पूर्णाहूती करण्यात आली. सायंकाळी ७ वाजता पुष्पांजली महिला मंडळ संगीत सुंदरकाण्ड पठण सादर केले. हनुमान जयंतीनिमित्ताने पंचमुखी हनुमान मंदिरात विविध आखाड्यांचे साधू, महंत तसेच भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. हनुमान जयंतीनिमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी भाविकांना रस वाटप करण्यात आला.जुना आडगाव नाक्यावरील पुरातन काटया मारु ति मंदिरात पहाटे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. सकाळी पुजारी विवेक राजहंस यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. गजानन चौकातील हनुमान मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हनुमान पूजन व महाप्रसाद वाटप करण्यात आला.बंजारमाता मंदिर येथील बालाजी मित्रमंडळाच्या वतीने साईबाबा मंदिराजवळ हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येऊन भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. पाथरवट लेन सत्यबाल मित्रमंडळाच्या वतीने हनुमान मंदिरात सकाळी विधीवत पूजन, महाआरती करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.लक्ष्मण रेखा येथील श्री झुंड हनुमान मित्रमंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्ताने शुक्र वारी सकाळी मुख्य मंदिरात जन्मोत्सव साजरा करून महापूजा करण्यात आली. सायंकाळी परिसरातून हनुमान पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गजानन चौकातील मारुती मंदिरात दरवर्षीप्रमाणे पहाटे हनुमान जन्मोत्सव साजरा करून भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. हिरावाडीतील पेशवेकालीन हनुमान मंदिरात शनिवारी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येऊन प्रसाद वाटप कार्यक्र म झाला. पेशवेकालीन मारुती मंदिर विश्वस्त मंडळ, मेहरुणकर जोशी समाज सेवा संघ, साईराज मित्रमंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्र माचे आयोजन केले होते. सेवाकुंज येथील संकट मोचन हनुमान मंदिरात सकाळी हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. हनुमान जन्मोत्सव त्यानंतर हनुमान चालिसा पठण, प्रसाद वाटप कार्यक्र म संपन्न झाला.पालखी मिरवणूक पूजा, अभिषेकहनुमान जयंतीचे औचित्य साधून जन्मोत्सव, पालखी मिरवणूक, पूजा, अभिषेक, हनुमान चालिसा पठण, महाप्रसाद वाटप आदिंसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.जुना आडगाव नाका येथे श्री पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्ताने कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५ वाजता महाअभिषेक पूजन करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक