शिवराजसिंह चौहान यांच्याकडून त्र्यंबकराजाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 13:33 IST2020-01-01T13:33:03+5:302020-01-01T13:33:36+5:30

त्र्यंबकेश्वर : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथील ज्योतिर्लिंग मंदीरात महामृत्युंजय भगवान त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी आले होते.

 Darshan of Trimbakaraja by Shivraj Singh Chauhan | शिवराजसिंह चौहान यांच्याकडून त्र्यंबकराजाचे दर्शन

शिवराजसिंह चौहान यांच्याकडून त्र्यंबकराजाचे दर्शन

त्र्यंबकेश्वर : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथील ज्योतिर्लिंग मंदीरात महामृत्युंजय भगवान त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी आले होते. सकाळी ११ वाजता आलेले चौहान थेट कोठीच्या उत्तर द्वाराने आले. तेथे भाजप युवा मोर्चा व त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतफ त्यांचे स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कार्यालयात सोवळे नेसुन त्यांनी श्रीत्र्यंबकेश्वर मंदीरात संकल्प सोडुन लघुरु द्र पुजा केली. पुजेचे पौराहित्य पुरोहित वामनशास्त्री गायधनी व सुयोग वाडेकर यांनी केली. पुजेनंतर आरती पुष्पांजली होउन भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम, माजी विश्वस्त तथा त्र्यंबक नगरपरिषदेचे नगरसेवक अ‍ॅड.श्रीकांत गायधनी यांच्या हस्ते चौहान यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना भगवान त्र्यंबकेश्वराची प्रतिमा भेट देण्यात आली.

Web Title:  Darshan of Trimbakaraja by Shivraj Singh Chauhan

टॅग्स :Nashikनाशिक