नरेंद्र महाराजांचा बुधवारी दर्शन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:12 IST2019-05-19T00:00:32+5:302019-05-19T00:12:33+5:30

श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा येत्या बुधवारी व गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे. रामशेज किल्ल्याजवळ नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे हा सोहळा होणार आहे.

Darshan Soukar of Narendra Maharaj on Wednesday | नरेंद्र महाराजांचा बुधवारी दर्शन सोहळा

नरेंद्र महाराजांचा बुधवारी दर्शन सोहळा

पंचवटी : श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा येत्या बुधवारी व गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे. रामशेज किल्ल्याजवळ नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे हा सोहळा होणार आहे.
श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज आध्यात्मिक कार्यासोबतच संस्थानामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवितात. महाराष्ट्र सिकलसेल अनेमिया, हिमोफिलिया, थॅलॅसेमिया, रुग्ण जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत गरज असते. यासाठी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्ताच्या बाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत निश्चित करण्यात आले आहे. संप्रदायाच्या आवाहनाला प्रतिसाद देत २५ हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. दोन दिवसांत समस्या मार्गदर्शन तसेच नवीन साधकांना साधक दीक्षा दिली जाणार आहे. कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Darshan Soukar of Narendra Maharaj on Wednesday