तिहेरी तलाक कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 05:06 PM2018-09-20T17:06:58+5:302018-09-20T17:07:41+5:30

मालेगाव : तिहेरी तलाक कायद्याच्या निषेधार्थ येथील मुस्लिम पर्सनल लॉ बचाव कमेटीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. तिहेरी तलाकाच्या वटहुकूमाला संसदेने मंजुरी दिली आहे. या कायद्याला मुस्लिम महिलांचा विरोध आहे. येथील मुस्लिम पर्सनल लॉ बचाव कमेटीच्या अध्यक्षा नगरसेविका शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी येथील मोसमपुलावर महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले.

   Dare movement against Triple divorce law | तिहेरी तलाक कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन

तिहेरी तलाक कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्दे येथील मुस्लिम पर्सनल लॉ बचाव कमेटीच्या अध्यक्षा नगरसेविका शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी येथील मोसमपुलावर महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. यावेळी तिहेरी तलाक कायदा गैरकायद्याचा आहे. विधेयक मागे घ्यावे. शरीयतमध्ये हस्तक्षेप


मालेगाव : तिहेरी तलाक कायद्याच्या निषेधार्थ येथील मुस्लिम पर्सनल लॉ बचाव कमेटीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. तिहेरी तलाकाच्या वटहुकूमाला संसदेने मंजुरी दिली आहे. या कायद्याला मुस्लिम महिलांचा विरोध आहे. येथील मुस्लिम पर्सनल लॉ बचाव कमेटीच्या अध्यक्षा नगरसेविका शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी येथील मोसमपुलावर महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. यावेळी तिहेरी तलाक कायदा गैरकायद्याचा आहे. विधेयक मागे घ्यावे. शरीयतमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनात माजी नगरसेविका जैबुन्नीसा अब्दूल बाकी, शाहीदा मुश्ताक अहमद, साजदा उस्मान गनी, राशदा अब्दूल खालीक, शहनाज परवीन एकबाल, मेहबानो मो. हुसेन, मुस्लिम धांडे, आफताब आलम आदि सहभागी झाले होते.

 

 

Web Title:    Dare movement against Triple divorce law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.