Daranakath: Leopards arrested in Samangaon after hard work | दारणाकाठ : अथक परिश्रमानंतर सामनगावात बिबट्या जेरबंद

दारणाकाठ : अथक परिश्रमानंतर सामनगावात बिबट्या जेरबंद

ठळक मुद्देदहा दिवसांत दुसरा बिबट्या पिंज-यातबिबट्या भक्ष्याच्या शोधात पहाटे पिंज-यात अडकला

नाशिक :नाशिक तालुक्यातील दारणाकाठालगतच्या दोनवाडे ते बाभळेश्वरपर्यंतच्या पंचक्रोशीत महिनाभरापासून बिबट्या या वन्यप्राण्याचा धुमाकूळ सुरू असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले होते. वनविभागाच्या पथकाकडून या भागात सुमारे १७ पिंजरे तैनात करून विविध प्रयोग राबवित कौशल्यपणाला लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अथक परिश्रम घेतले जात होते, अखेर वनविभागाला सोमवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास यश आले. सामनगावात बाभळीच्या वृक्षांच्या मध्यभागी लावलेल्या पिंजऱ्यात प्रौढ नर बिबट्या जेरबंद झाला.
सामनगावातील पोलीस पाटील मळ्यात राहणारे एकनाथ जगताप यांच्या घराच्या अंगणात खेळणा-या ओम विष्णू कडभाने (४) या चिमुकल्यावर बिबट्याने २८ जून रविवार रोजी हल्ला केला होता; सुदैवाने या हल्ल्यात ओमचे प्राण वाचले. या पाटील मळ्यापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या बळवंत मुरलीधर जगताप यांच्या गट क्रमांक-८१लगत लावलेल्या पिंजºयात अखेर बिबट्या पहाटे भक्ष्याच्या शोधात अडकला. पिंज-यात बिबट्या गुरगुरूत डरकाळ्या फोडू लागल्याने सकाळी शेतावर जाण्यासाठी निघालेल्या गावकऱ्यांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. पिंजºयात बिबट्या असल्याची खात्री पटल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला त्याबाबत माहिती दिली. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे, विजय पाटील यांचे पथकत तत्काळ सामनगावात पोहचले. काही वेळेतच नाशिक पश्चिम वनविभागाचे वन्यप्राणी रेस्क्यू वाहनासह चालक प्रवीण राठोड यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा तत्काळ घटनास्थळावरून वाहनाद्वारे वनकर्मचा-यांनी सुरक्षितरित्या हलविला. बिबट्या सुस्थितीत असून त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात येणार आहे. तुर्तास या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार नसल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ सूत्रांकडून समजते.

दहा दिवसांत दुसरा बिबट्या पिंज-यात
दारणाकाठालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा धूमाकूळ सुरू असून ३८ ट्रॅप कॅमेरे आणि २० पिंजरे या भागातील विविध बिबट प्रवण गावांच्या क्षेत्रात वनविभागाकडूत तैनात करण्यात आले आहे. २ जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास जाखोरीत बबलू सय्यद यांच्या शेतात लावलेल्या पिंज-यात बिबट्याची मादी जेरबंद झाली होती. त्यानंतर सोमवारी (दि.१३) येथून अवघ्या सहा ते सात किलोमीटरवर असलेल्या सामनगावात प्रौढ नर बिबट्या पिंज-यात अडकला. दहा दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यास नाशिक पश्चिम वनविभागाला यश आले.

Web Title: Daranakath: Leopards arrested in Samangaon after hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.