शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूमुळे बालकाचा बळी

By admin | Updated: October 23, 2014 00:05 IST

जुने नाशिक : रुग्णसंख्येत वाढ; एकवीस दिवसांत आढळले ६८ रुग्ण

नाशिक : शहरात दिवसेंदिवस डेंग्यूरुग्णांची संख्या वाढत असून, जुन्या नाशकात संशयित डेंग्यूरुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. ऐन सणासुदीच्या दिवसांत रोगराईने डोके वर काढले असून, चालू महिन्यात २१ दिवसांत १४० संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी ६८ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.शहरात यंदाच्या पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. गेल्या महिन्यापर्यंत परिस्थिती आटोक्यात असल्याचा दावा केला जात होता. या महिन्यापर्यंत हीच स्थिती होती; परंतु आता त्यात बदल झाला असून, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच बुधवारी पहाटे कथडा परिसरातील फैजान असिफ शेख या संशयित डेंग्यूरुग्ण बालकाचा बुधवारी पहाटे शहरातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तो अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्याला आधी मविप्रच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तद्नंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्याचा मृत्यू झाला. खासगी प्र्रयोगशाळेत या मुलाला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले असले, तरी शासकीय प्रयोगशाळेतून अधिकृतरीत्या त्याची पुष्टी झालेली नाही, असे पालिकेच्या वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले.दरम्यान, शहरात रुग्णसंख्या वाढतच असून, गेल्या २१ दिवसांत १४० संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर त्यापैकी १२३ अहवाल प्राप्त झाले असून, ६८ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तथापि, यापैकी ५१ रुग्णच पालिकेच्या हद्दीतील असून, उर्वरित रुग्ण बाहेरील असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)