दिंडोरी तालुक्यातील धरणे पाण्याविना उपासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:00 IST2020-08-03T15:00:19+5:302020-08-03T15:00:42+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने आपला लहरीपणा दाखवत कमी पाऊस पडला. त्यामुळे परिणाम तालुक्यातील धरणावर होऊन पाण्याची पातळी घटली आहे.

दिंडोरी तालुक्यातील धरणे पाण्याविना उपासी
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने आपला लहरीपणा दाखवत कमी पाऊस पडला. त्यामुळे परिणाम तालुक्यातील धरणावर होऊन पाण्याची पातळी घटली आहे.
दिंडोरी तालुक्याला संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. मागील वर्षी या तालुक्यात पाऊस अव्वाच्या सव्वा पडल्याने तालुक्यातील सर्व धरणे १०० टक्के भरली होती. त्यामुळे आता तालुक्यावर पाणी टंचाईचे संकट येणार नाही. यामुळे या तालुक्यातील शेतकरी वर्ग आनंदीत झाला होता. या तालुक्यावर इतर तालुके पाण्यासाठी आतुरलेले असतात.
कारण या तालुक्यातील धरणातील काही पाण्याचासाठा इतर तालुक्यासाठी राखीव स्वरु पचा ठेवलेला असतो. म्हणून दिंडोरी तालुक्याप्रमाणे इतर तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे संकट आले नाही. धरणातून इतर तालुक्याला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी रोटेशन पध्दतीने सोडण्याचे वार्षिक नियोजन हे अगोदरच शासन करीत असते.
परंतु यंदा मात्र पावसाने दिंडोरी तालुक्यात आपला लहरी पणा दाखविल्यामुळे पाऊस पडण्याचे सरासरी प्रमाण मागीलवर्षी पेक्षा कमी आहे. त्यामुळे राखीव व रोटेशन पध्दतीचे पाणी तालुक्याला व इतर तालुक्यांना सोडल्यामुळे प्रत्येक धरणाची पाण्याची पातळी घटली आहे. आता जोरदार पाऊस होईल. व पुन्हा एकदा धरणातील पाण्याचा साठ्यात वाढ होईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
आहे.
(फोटो ०३ दिंडोरी,०१ )