कोकणंगाव साकोरे शिरसगाव परिसरात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:38 IST2019-11-02T17:38:09+5:302019-11-02T17:38:51+5:30
कोकणंगाव : निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून द्राक्षे मका सोयाबीन भुईमूग टमाटा इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आह. े पाण्याची टंचाई असतांना पाणी विकत घेऊन द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी जगविल्या होत्या व यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंद झाला होता. पण परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. जीवाचे रान करून पिके जगली, पण परतीच्या पावसाने सारे काही उध्वस्त केल.े यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कोकणगाव साकोरे शिरसगाव वडाळी नजीक या गावांमध्ये तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे.

द्राक्ष बागेचा पंचनामा करतांना तलाठी श्रीमती नागोरे, कृषी अधिकारी राठोड, ग्रामविकास अधिकारी बापुसाहेब आहिरे, अनिल बोरस्ते, उपसरपंच व ग्रामस्थ.
कोकणंगाव : निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून द्राक्षे मका सोयाबीन भुईमूग टमाटा इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आह.
े पाण्याची टंचाई असतांना पाणी विकत घेऊन द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी जगविल्या होत्या व यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंद झाला होता. पण परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. जीवाचे रान करून पिके जगली, पण परतीच्या पावसाने सारे काही उध्वस्त केल.े यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कोकणगाव साकोरे शिरसगाव वडाळी नजीक या गावांमध्ये तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे.
शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा पोंग्यात व फुलारा अवस्थेपर्यंत वाचवली होती, पण परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
द्राक्ष पिकाची कुज होऊन द्राक्ष गळून पडले आहे पावसाच्या माºयाने गड जिरून पूर्ण द्राक्षबागा उद्ध्वस्त झाले आहे.
औषधांचा खर्च वाढणार आहे ते शुक्र वारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे परत शेतकरी हवालिदल झाला आहे ओला दुष्काळ जाहीर करावा
अशी मागणी सुरेश गायकवाड, प्रताप मोरे, किशोर मोरे, विलास गायकवाड, शरद गायकवाड, संतोष गायकवाड, रवींद्र मोरे, संदीप मोरे, प्रताप मोरे, नामा गायकवाड, शंकर गायकवाड, भास्कर मोरे, दिलिप मोरे, रमेश गायकवाड शेतकरी करू लागले आहे.
प्रतिक्रि या..
उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करत द्राक्षबाग जागविली होती, पण परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आह.े बागेसाठी केलेला खर्च वाया गेलेला आहे. तरी पंचनामा करून शासनाने जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी.
- अनिल बोरस्ते, साकोरे (मिग) शेतकरी.
जीवाचे रान करून पिके जगवली परंतु परतीच्या पावसाने सारे काही उध्वस्त केले शासनाने निफाड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकºयांना जास्तीत जास्त नुसकान भरपाई शासनाने द्यावी,
- आण्णासाहेब मोरे, माजी संचालक द्राक्ष बागाईतदार संघ पुणे.
शेती पिकांचे मोठे नुसकान झाले आहे शासनाने नुकसानीचे पंचनामे करून संपूर्ण भरपाई द्यावी व सर्व कर्ज माफ करावे विज बिल माफ करावे चालू आर्थिक वर्षी बिनव्याजी शेतकर्यांना कर्ज द्यावे,
- विक्र म सदाशिव मोरे द्राक्ष उत्पादक शेतकरी कोकणंगाव.