धाराची वाडी येथे आगीत घराचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:45 PM2020-01-02T23:45:48+5:302020-01-02T23:46:07+5:30

टाके देवगावपैकी धाराची वाडी येथील घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Damage of a fire house at Dhara Wadi | धाराची वाडी येथे आगीत घराचे नुकसान

धाराची वाडी येथे आगीत घराचे नुकसान

Next

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील टाके देवगावपैकी धाराची वाडी येथील घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तानाजी शिद, नामदेव बांगारे आदी कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाहणी केली. घरमालक रामा शिवा मेंगाळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊन सर्व कार्यकर्ते त्र्यंबकेश्वर येथे येऊन तहसीलदार दीपक गिरासे यांची भेट घेऊन घडलेला प्रकार त्यांना सांगितला.
रामा शिवा मेंगाळ असे या घरमालकाचे नाव आहे. घरात आग लागली त्यावेळी लहान मुले बाहेरच खेळत होती. आगीचे कारण समजू शकले नाही. तांदूळ, किराणा, कपडे, मोबाइल, तेल आदी जीवनाश्यक वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या. बांगारे कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन श्रमजीवी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना करण्यात आले आहे.

Web Title: Damage of a fire house at Dhara Wadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.