येवला तालुक्यात शेतपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:21 IST2020-09-07T21:52:00+5:302020-09-08T01:21:21+5:30

येवला : सलग दोन-तीन दिवस तालुक्यातील नगरसूल, अंदरसूल, धामोडे, अनकुटे, विसापूर, सावरगाव, मानोेरी, देशमाने परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Damage to crops in Yeola taluka | येवला तालुक्यात शेतपिकांचे नुकसान

येवला तालुक्यात शेतपिकांचे नुकसान

ठळक मुद्देदोन-तीन दिवसांपासून वातावरणातील उष्मा वाढलेला

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : सलग दोन-तीन दिवस तालुक्यातील नगरसूल, अंदरसूल, धामोडे, अनकुटे, विसापूर, सावरगाव, मानोेरी, देशमाने परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणातील उष्मा वाढलेला असून, दुपारच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. अकस्मातपणे धडकणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे.
तालुक्यातील टोमॅटो, मका, बाजरी, मूग, भुईमूग आदी प्रमुख पिकांना या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. काही ठिकाणी मका, बाजरी पिके भुईसपाट झाली असून, काही ठिकाणी कांदा रोप वाहून गेले आहे. शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास अकस्मात होणाºया पावसाने हिरावला जातो की काय, या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

Web Title: Damage to crops in Yeola taluka