शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

क्रशर, ब्लास्टिंगमुळे शेतपिकांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 14:53 IST

सिन्नर: समृद्धी महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, क्रशरसह मिक्सर मशीन, सिमेंट प्लांट तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ...

सिन्नर: समृद्धी महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, क्रशरसह मिक्सर मशीन, सिमेंट प्लांट तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली असून, गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन राहिलेले नाही. तालुका कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांनी गेल्या दोन वर्षांपासून पंचनामे करूनही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठाणेस्थित कार्यालयापासून नाशिकच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहे. समृद्धी महामार्गाचे व्यवस्थापक राधेश्याम मोपलवार यांनाही वैयक्तिक मेसेज पाठवून प्रकरणांची माहिती दिली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनाही सर्व कागदपत्रांची माहिती त्यांचे स्वीय सहायक यांच्यामार्फत सादर केली आहेत. तरीही अजून कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता नाशिक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना योग्य ती कार्यवाही होईल, असे आश्वासन देऊन बोळवणी केली जात आहे.--------------चारा पिकांवर धूळशेती पिकांबरोबरच जनावरांसाठी चारा उत्पादन थांबले आहे. चारा पिकांवरही धूळ, सिमेंटने विपरीत परिणाम केला असून, दुभत्या गाई-म्हशींना बाधा होऊ लागली आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसायही बाधित झाला आहे. त्यामुळे जगायचे तरी कसे, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. लवकरात लवकर संबंधित विभागाने पंचनाम्याच्या ठरलेल्या मोबदल्याप्रमाणे योग्य नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे; अन्यथा लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही येथील नामदेव वाघ यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.---------------------फळबागांसह शेतमालाचे नुकसानगेल्या दोन वर्षांपासून सीताफळ, पेरू, आंब्याच्या बागा, टोमॅटो, कांदा, काकडी, वांगे तसेच इतर कडधान्य पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील घरांचेही अतोनात नुकसान झाले आहे. याची जाणीव कंपनी अधिकाऱ्यांनाही असून, त्यांनी तसेच एमएसआरडीसीनेही पाहणी केलेली आहे. तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींनाही या गोष्टीची माहिती दिलेली आहे, त्यांनी या विषयाकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. आज अशा कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक