पावसाने मालवाहू रिक्षाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 01:48 IST2020-10-19T22:30:12+5:302020-10-20T01:48:11+5:30
औंदाणे : आधीच लॉकडाउनमध्ये तीन महिने घरी बसून उसनवार पैसे घेऊन कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण केल्या. आता कुठं मोलमजुरी व छोटा मोठा गाडीचा व्यवसाय सुरू झाला होता. त्यात शनिवारी परतीच्या पावसाने रात्रीच्या सुमारास झोपी गेलेल्यांची स्वप्न भंग करणारी रात्र ठरली.

आराई येथील देविदास शिंदे यांची पाण्याच्या प्रवाहात नाल्यात वाहुन गेलेली रिक्षा.
ठळक मुद्दे नुकसानगस्त युवकास भरपाई मिळण्याची अपेक्षा
औंदाणे : आधीच लॉकडाउनमध्ये तीन महिने घरी बसून उसनवार पैसे घेऊन कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण केल्या. आता कुठं मोलमजुरी व छोटा मोठा गाडीचा व्यवसाय सुरू झाला होता. त्यात शनिवारी परतीच्या पावसाने रात्रीच्या सुमारास झोपी गेलेल्यांची स्वप्न भंग करणारी रात्र ठरली आराई (ता. बागलाण) येथील देविदास शिवाजी शिंदे या युवकाचे पोट भरण्याचे साधन असलेले माल वाहू रिक्षा प्नाल्यात वाहुन नादुरुस्त झाली. यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय स्तरावरुन नुकसानगस्त युवकास भरपाई मिळण्याची अपेक्षा रखमाबाई शिंदे यांनी केली आहे.